NEFT म्हणजे काय? । NEFT बद्दल माहिती । NEFT Full Form in Marathi

NEFT म्हणजे काय? । NEFT बद्दल माहिती । NEFT Full Form in Marathi

मित्रांनो आजच्या वर्तमान काळामध्ये इंटरनेट हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे इंटरनेट बँकिंग करणे हे सर्वांच्या पसंतीचे झाले आहे. मित्रानो तुम्ही देखील इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्ही नेफ्ट बद्दल नक्कीच ऐकले असेल.

ऑनलाईन स्वरूपाने किंवा इंटरनेटच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करण्याचे मुख्य तीन पर्याय आहेत. NEFT, RTGS आणि IMPS परंतु यात इनिंगमध्ये नेफ्ट द्वारे पैसे ट्रान्सफर करणे हे सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे यांनी NEFT याबद्दल सर्वसामान्य लोकांना माहिती असणे खूप आवश्यक आहे. म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला NEFT म्हणजे काय?, NEFT full form in Marathi सोबतच NEFT बद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत

NEFT Full Form in Marathi

मित्रांनो, NEFT full form in English “National Electronic Fund Transfer” असा होतो तर NEFT full form in Marathi ” राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण” असा होतो.

NEFT हे एक ऑनलाईन सेवा आहे जी ची सुरुवात भारतीय रिझर्व बँक ने सुरु केली आहे. या सेवेच्या अंतर्गत तुम्ही जलद आणि सुरक्षित इलेक्ट्रॉनिक्स रूपाने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या बँक मध्ये पैसे पाठवू शकता.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला केवळ योग्य इंटरनेटची आवश्यकता भासते, आणि आजच्या काळामध्ये इंटरनेट ही सर्वांची मूलभूत गरज बनली आहे. त्यामुळे बहुतांश लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नेफ्ट चा वापर करतात.

NEFT म्हणजे काय?

मित्रानो, NEFT म्हणजेच “national electronic fund transfer” होय. नेफ्ट ही एक अशी सेवा आहे, या सेवेच्या अंतर्गत आपण एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला ऑनलाईन स्वरूपाने बँकेमध्ये पैशाची देवाणघेवाण करू शकतो.

लेफ्ट ही एक इलेक्ट्रॉनिक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली आहे. पैसे सहज आणि सुरक्षित स्वरूपाने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवण्यासाठी या प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या बँक खात्यातून दुसर्‍या व्यक्तीच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित करायचा असेल, तर तो NEFT च्या प्रक्रियेद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतो आणि पैसे काढू शकतो आणि नंतर ते रोख स्वरूपात किंवा चेक लिहून जमा करू शकतो.

NEFT या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणत्याही शाखेतील कोणत्याही खात्यातून कोणत्याही ठिकाणी असलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात. हेच कारण आहे ज्यामुळे बहुतांशी लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT या प्रणालीचा वापर करतात.

परंतु मित्रांनो नेफ्ट द्वारे ट्रांजेक्शन करताना एकच आहे ती म्हणजे ट्रांजेक्शन करणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या बँक आया नेफ्ट पेमेंट स्विकारण्यासाठी सक्षम असाव्या.

मित्रांनो आम्हाला अशा आहे की आता आपणास NEFT full form in Marathi आणि NEFT म्हणजे काय? हे कळाले असेल.

NEFT इतिहास :

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर जी भारतीय रिझर्व्ह बँक ने सुरू केलेली सेवा आहे.

NEFT हे नोव्हेंबर 2005 मध्ये सुरू करण्यात आले होते, ज्याचा कार्यभार बँकिंग Technology तील विकास आणि संशोधन संस्थेकडे (आयडीबीआरटी) कडे सोपविण्यात आला. भारतातील सर्व बँकांमध्ये ज्या NEFT सक्षम आहेत,त्यातील खातेधारक या सुविधेचा वापर सहजपणे पैसे हस्तांतरित करण्यासाठी करू शकतात. यामध्ये इलेक्ट्रॉनिक संदेशांचा वापर केला जातो.

देशभरातील 101 बँकांच्या 82500 शाखांपैकी 74600 शाखांमध्ये NEFT ही सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय ज्या बँकांमध्ये ही सुविधा आहे, त्यांच्या वेबसाइटवर ही सेवा ऑनलाइन बँकिंगद्वारे काम करते. या सेवेला खूप लोकप्रियता मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे यामुळे वेळेची बचत होते आणि त्यात निधी हस्तांतरित करणे सोपे होते.

NEFT अंतर्गत असलेल्या बँका :

मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला NEFT च्या अंतर्गत असलेल्या बँकांची यादी सांगणार आहोत जी पुढील प्रमाणे आहेत.

  1. ICICI NEFT
  2. SBI NEFT
  3. सेंट्रल बँक ऑफ इंडिया NEFT
  4. बँक ऑफ बडोदा NEFT
  5. HDFC NEFT
  6. Axis बँक NEFT
  7. पंजाब नॅशनल बँक (PNB) NEFT
  8. युनियन बँक ऑफ इंडिया NEFT
  9. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) NEFT
  10. सिंडिकेट बँक NEFT

FAQ :

  1. NEFT full form in Marathi काय होतो?
    उत्तर: मित्रांनो, NEFT full form in Marathi ” राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण” असा होतो.
  2. NEFT कधी सुरू करण्यात आले?
    उत्तर:NEFT हे नोव्हेंबर 2005 मध्ये सुरू करण्यात आले होते.

मित्रांनो, NEFT full form in Marathi हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!!!

Leave a Comment